Homeक्राईमफुरसुंगी पोलीसांची वाहन चोरांविरोधात धडक कारवाई. अटक आरोपीकडून तीन दुचाकी मोटारसायकल एकुण...

फुरसुंगी पोलीसांची वाहन चोरांविरोधात धडक कारवाई. अटक आरोपीकडून तीन दुचाकी मोटारसायकल एकुण १,२५,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ०३ गुन्हे उघड

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

फुरसुंगी पोलीसांची वाहन चोरांविरोधात धडक कारवाई.
अटक आरोपीकडून तीन दुचाकी मोटारसायकल एकुण १,२५,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ०३ गुन्हे उघड

मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:-  दिनांक ११/०५/२०२५ रोजी सकाळी ०७/०० घा. चे सुमारास श्री अनिरुध्द श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांची अॅक्टीवा दुचाकी ग्रे रंगाची तिचा आर टी ओ क्र. एम एच १२ यु झेड ६८९५ ही तुकाई टेकडी, गणेश मंदिरासमोर, हडपसर पुणे येथे पार्क केली होती.

त्यानंतर ०९/०० वा. चे सुमारास परत दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी गाडी मिळून आली नाही. परिसरामध्ये शोध घेवूनही दुचाकी मिळून आली नसल्याने सदर बाबत अनोळखी चोरटयाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पो.स्टे. गु.र.नं. ९३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि. १२/०५/२०२५ रोजी फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे गुन्हयातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच अज्ञात चोरटयाचा तपास करणेकरीता पथके तयार करण्यात आली होती. दि.१५/०५/२०२५ रोजी गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस पथकास संशयीत एक इसम ॲक्टीवा दुचाकी वाहनासह त्यास मागे व पुढे नंबर प्लेट नसलेल्या स्थितीत मिळून आला. पोलीस पथकास संशय आल्याने त्याचेकडे असलेल्या दुचाकीबाबत तपास केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने दुचाकीच्या इंजिन नंबर व चासी नंबर वरून माहिती घेतली असता ती फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरील गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेवून आणखी सखोल तपास केला असता त्याने आणखी दोन दुचाकी मोटारसायकल चोरी केली असल्याची माहिती दिली.

त्याप्रमाणे दुचाकी वाहने पंचनाम्याने ताब्यात घेण्यात आली असून सदर दुचाकी वाहनाबाबत अभिलेखावरून माहिती घेतली असता फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ९७/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्हयातील अॅक्टीवा दुचाकी व दुसरी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे येथील गु.र.नं. १५६४ / २०२४ मा न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाली आहेत. आरोपीत हा रेकॉर्डवरील व सारईत असल्याने त्यास लागलीच गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडून फुरसुंगी पोलीस स्टेशनकडील दोन गुन्हे व हडपसर पोलीस स्टेशनकडील एक गुन्हा असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आले असून त्याने चोरी केलेली तीन दुचाकी वाहने एकुण १,२५,०००/- रुपये किंमतीची हस्तगत करण्यात आली आहेत.

अटक आरोपीचे नाव –
१) आतिष किसन जाधव, वय २१ वर्षे, राहणार. संतोष चंद यांचे घरामागे, मराठी शाळेजवळ, चंदवाडी, फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे. मुळ गाव. मु.पो. बिटरगाव तालुका.करमाळा, जिल्हा. सोलापुर.

वरील कामगिरी मा. डॉक्टर. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहायक. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, मा. मंगल मोढवे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पर्णे शहर यांचे सुचनेप्रमाणे राजेश खांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकातील पोउनि विष्णू देशमुख, पोलीस अंमलदार हरिदास कदम, सतिश काळे, महेश उबाळे, वैभव भोसले, सुनिल कांबळे, तुकाराम गुरव, सागर वणवे, हेमंत कामठे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पणे शहर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

वरील गुन्हयाचा तपास फुरसुंगी पो.स्टेशनकडील तपास पथकाकडून करण्यात येत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61 डी 1002.175077774162.291476 सी Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.17507774039.28DC3BA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.17507771758.36BF86A6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750768253.1E72729 Source link

वनप्लस नॉर्ड 5 कॅमेरा तपशील 8 जुलैच्या प्रक्षेपणपूर्वी उघडकीस आला; 55 डीबी एएनसी पर्यंत...

वनप्लस नॉर्ड 5 8 जुलै रोजी वनप्लस नॉर्ड सीई 5 च्या सोबत भारतात लॉन्च होणार आहे. दरम्यान, वनप्लस कळ्या 4 टीडब्ल्यूएस इयरफोन देखील त्याच...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61 डी 1002.175077774162.291476 सी Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.17507774039.28DC3BA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.17507771758.36BF86A6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750768253.1E72729 Source link

वनप्लस नॉर्ड 5 कॅमेरा तपशील 8 जुलैच्या प्रक्षेपणपूर्वी उघडकीस आला; 55 डीबी एएनसी पर्यंत...

वनप्लस नॉर्ड 5 8 जुलै रोजी वनप्लस नॉर्ड सीई 5 च्या सोबत भारतात लॉन्च होणार आहे. दरम्यान, वनप्लस कळ्या 4 टीडब्ल्यूएस इयरफोन देखील त्याच...
error: Content is protected !!