Homeक्राईमगोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश

गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ 

गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश

मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला व पुरुषांवर कारवाई करत पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या या कारवाईत एकूण दहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

माननीय. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी पुणे शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त परिमंडळ क्रमांक १, पुणे, श्री. कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील डिस्को बिल्डिंग परिसरात काही बांगलादेशी महिला व पुरुष अनधिकृतपणे राहत आहेत. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार छापा टाकण्याची कारवाई करण्यात आली.

फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम नामवाडे, वरिष्ठ प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे तसेच पोलीस कर्मचारी आणि पंचांसह डिस्को बिल्डिंग परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान नऊ बांगलादेशी महिला आणि एक बांगलादेशी पुरुष पोलिसांच्या ताब्यात आले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी केली असता, हे सर्वजण भारतात बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करून छुप्या पद्धतीने वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. काही महिला स्वेच्छेने बुधवार पेठ परिसरात देहव्यवसाय करत असल्याचे, तर पुरुष मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे.

तसेच त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे आढळून आल्याने सर्वांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही संपूर्ण कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले, श्री. मिलींद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत धक्कादायक घटना: आईकडून मुलाची हत्या, मुलीवरही प्राणघातक हल्ला

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  वाघोलीत धक्कादायक घटना: आईकडून मुलाची हत्या, मुलीवरही प्राणघातक हल्ला   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून...

खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- खेड शहरात भरवस्तीमध्ये घडलेल्या मोठ्या...

एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी गावाच्या...

शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- शिरूर शहरातील गॅरेज चालकाच्या...

हुंड्याच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या; पती व सासू अटकेत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ हुंड्याच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या; पती व सासू अटकेत   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत...

error: Content is protected !!