Homeताज्या बातम्याचिखली - कुदळवाडी भागात अतिक्रमण कारवाईमध्ये सातव्या दिवशी ६३३ पत्राशेड अनधिकृत बांधकामे...

चिखली – कुदळवाडी भागात अतिक्रमण कारवाईमध्ये सातव्या दिवशी ६३३ पत्राशेड अनधिकृत बांधकामे निष्कासित

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

चिखली – कुदळवाडी भागात अतिक्रमण कारवाईमध्ये सातव्या दिवशी ६३३ पत्राशेड अनधिकृत बांधकामे निष्कासित

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- चिखली – कुदळवाडी येथे सलग सातव्या दिवशी १९२ एकर जागेत असलेल्या ६३३ अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. याठिकाणी असलेले अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे या कारवाईमध्ये निष्कासित करण्यात आले.

नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली – कुदळवाडी येथे निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. याठिकाणी आज ८३ लाख ९७ हजार २४९ चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले. यामध्ये एकूण ६३३ बांधकामाचा समावेश होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हाती घेण्यात आली. या कारवाई वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, सीताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, शीतल वाकडे, अमित पंडित, सुचिता पानसरे, किशोर ननवरे, श्रीकांत कोळप, महेश वाघमोडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या निष्कासनाच्या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. तर ४४ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर करण्यात आला. ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील याठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका आणि पोलीस यंत्रणेसह वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750655170.3052F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750654381.9B3FD22 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750652045.1E536382 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750647327.9A72A14 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.175064726.9A5187E Source link

error: Content is protected !!