जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरणा-यास केले
चार तासात जेरबंद
डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- डेक्कन पोलीस ठाणे हद्यीत दि.१५/०२/२०२५ रोजी धुणी भांडयाचे काम करणारे वयोवृध्द महिलेस लीफ्ट देण्याच्या बहाण्याने नदीपात्र वीटभट्टी जवळ मारहाण करण्याची धमकी देवुन, जबरदस्तीने, गळयातील सोनसाखळी हिसकावुन घेतले बाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हा दाखल होताच तात्काळ तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचे दिशेने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन तसेच गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत आरोपीचे नाव व पत्ता याची माहिती प्राप्त केली असता. सदर आरोपीचे नाव अक्षय ओक रा. शनिवार पेठ असे असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीनुसार अक्षय ओक हा शनिवार पेठ येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील अधिक तपासकामी डेक्कन पोलीस ठाणे येथे आणुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव अक्षय अनिरुद्ध ओक वय २७ वर्षे, धंदा लॉन्ड्री, रा. गजानन भवन, पेपर गल्ली, गांधी पेपर समोर, शनिवार पेठ, पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करुन सदर आरोपीकडुन
१,००,०००/-रू. किं.ची एक सोनसाखळी व.२०,०००/-रु.कि.ची दुचाकी असा एकुण १,२०,०००/-रु. असा मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक अजय भोसले हे करत आहेत.
सदरची कारवाई ही, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि. १ पुणे श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री. साईनाथ ठोंबरे, डेक्कन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री, प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक अजय भोसले. दत्तात्रय सावंत, सहा. पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, पोलीस अंमलदार महेश शिरसाठ सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, रोहित मिरजे, नागनाथ म्हस्के यांनी केली.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























