गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी ! दोन सराईत
गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह अटक करून घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल
गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर
पुणे :- दिनांक ३१/०१/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व पथक असे फ्रसंगी पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना मिळालेल्या खबरीवरून आरोपी नामे समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, वय १९ वर्षे, रा. गल्ली नं.२३, सय्यदनगर, हडपसर, पुणे यास गंगा नगर, फुरसुंगी, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे मो. सा. सह ताब्यात घेवुन सदर आरोपीताविरूद्ध हडपसर (फुरसुंगी) पो.स्टे. येथे गु.र.क्रं. १४८/२५, कलम ३.२५ आर्म अॅक्ट सह ३७ (१) सह १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन मा. वरिष्ठांचे आदेशाने सदरचा गुन्हा पुढील तपास कामी युनिट कडे वर्ग करण्यात आला होता.
नमुद अटक आरोपीताकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिल्याने खालील नमुद गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक आरोपीतास अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा अभिलेखावरील आरोपी नामे यश मुकेश शेलार, वय २० वर्षे, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी, पुणे यास अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत मुददेमाल वर्णन –
१) दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्रे, दोन जिवंत काडतुसे, दोन पुंगळया एकुण किंमत रू.६०,८००/-
२) विविध वर्णनाचे एकुण १४४ ग्रॅम सोन्याचे दागिने एकुण किंमत रू.१०,६५,६००/-
३)
कोंढवा पोलीस ठाणे गु.र.क्र. ६७/२०२५, भा. न्या.सं. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ ) ४) एक हिरो कंपनीची स्पलेंडर मो/ सा अं. किंमत रू ५०,०००/- (लोणी काळभोर ठाणे, गु.र.क्र. ४९/२०२५, भा.न्या. सं. कलम ३०३ (२))
५) एक होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड स्कुटर, अं. किंमत रु ४०,०००/- (हडपसर पो. ठाणे गु.र.क्र. १४१/२०२५, भा. न्या. सं. कलम ३०३ (२))
एकुण हस्तगत मालमत्ता रू.१२,१७,४००/-
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री विवेक मासाळ (अति. कार्यभार गुन्हे) मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, यनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो. हवा. सुहास तांबेकर, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख