Homeक्राईमगुन्हे शाखा, युनिट ३ ची धडाकेबाज कामगिरी ! सराईत चोरटयाकडून १० लाख...

गुन्हे शाखा, युनिट ३ ची धडाकेबाज कामगिरी ! सराईत चोरटयाकडून १० लाख किंमतीच्या चोरीच्या २५ दुचाकी जप्त..

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

गुन्हे शाखा, युनिट ३ ची धडाकेबाज कामगिरी ! सराईत चोरटयाकडून १० लाख किंमतीच्या चोरीच्या २५ दुचाकी जप्त..

गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर

मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४३०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) हया दाखल गुन्हयाचा समांतर तपास मा. श्री निखील पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री विवेक मासाळ, पोलीस उप- आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. श्री गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते हे करीत असताना दाखल गुन्हयाचे घटनास्थळी मिळाले सीसीटिव्ही फुटेजवरून दाखल गुन्हयातील मोटर सायकल चोरणारा आरोपी हा शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, रा. आदित्य अडसुळ यांचेकडे भाडयाने, मेमाने वस्ती, उरूळी देवाची, पुणे मुळ रा. फकीरा नगर, वैराग नाका, ता. तुळजापुर, जि. धाराशिव हा पोलीस अभिलेखावरील सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे नमुद आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता तो पर्वती, स्वारगेट, सोलापूर रोड मार्गे उरूळी देवाची दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे या नमुद मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणांचा पोलीस हवा. संजीव कळंबे यांनी मोबाईल टॉवर आयडी डम्प डाटा काढला. त्याचे तांत्रिक विश्लेषण करून नमुद आरोपीस बातमीदाराचे मार्फतीने दि.०६/०२/२०२५ रोजी इचलकरंजी, कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात असे निष्पन्न झाले की, त्याने मागिल ०५ महिन्यांचे कालावधीत जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहर परीसरातुन दुचाकी वाहने चोरी करून नमुद गाडयांच्या नंबरप्लेट काढून टाकून सदरच्या गाड्या त्याचे ओळखीचा गॅरेज मालक गॅरेज मु. पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे यास विक्रीकरीता नेवून देत होता. अनिकेत सुनिल कुदळे हा नमुद गाडयांना त्याच गावातील व परीसरातील गिऱ्हाईक शोधून त्यांची १५,०००/- ते २५,०००/- रूपयांना विक्री करत होता. अनिकेत सुनिल कुदळे याने काही गाडयांचे चेसीस व इंजिन नंबरवर ग्राईडर मशीन फिरवून नंबर पुसुन टाकले आहेत. अनिकेत सुनिल कुदळे याने ०१ गाडी स्वतःकडे व १५ गाड्यांची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच शंकर भरत देवकुळे हा आदित्य अडसुळ, मेमाने वस्ती, उरुळी देवाची, पुणे यांचेकडे भाडयाने रहात होता. तेथील घरासमोरून चोरी करून पार्क केलेल्या ०२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच शंकर भरत देवकुळे याचा तुळजापुर येथील मित्र अविनाश बाळु देडे, वय २२ वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, काकरंब, ता. तुळजापुर, जि. धाराशिव याचेकडे ठेवण्याकरीता दिलेल्या ०२ दुचाकी जप्त केल्या आहेत.

तसेच शंकर भरत देवकुळे याचे ओळखीचा नागनाथ विश्वनाथ जाधव वय ४५ वर्षे रा. फ्लॅट नंबर ११, सौरभ अपार्ट., शालीमार चौक, बमचाळ शेजारी, दौंड, जि. पुणे यास विकलेली ०१ दुचाकी व त्याचेकडे विक्रीकरीता ठेवलेल्या ०४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी एकुण २५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. सदर वाहनांमध्ये होंडा कंपनीची अॅक्टिव्हा ५, हिरो होंडा स्प्लेंडर ९, हिरो होंडा एचएफ डिलक्स ४, हिरो होंडा पेंशन प्रोव्ह १, होंडा कंपनीची यूनिकॉर्न ४, सुझुकी कंपनीची अॅक्सेस १, होंडा कंपनीची शाईन १ अशी एकूण २५ वाहने किं. रूपये ६,१०,०००/- ची जप्त करण्यात आलेली आहेत. सदर वाहनांबाबत सिंहगड रोड ३, पर्वती १, हडपसर ४, स्वारगेट – २, खडक २, भारती विदयापीठ १, सहकारनगर १, समर्थ १, दापोडी २, पिंपरी -१ असे वाहनेचोरीचे एकुण १८ गुन्हे नोंद असून उर्वतरी ०७ वाहनांचे मालकांचा शोध सुरू आहे.

आरोपी शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, रा. आदित्य अडसुळ यांचेकडे भाडयाने, मेमाने वस्ती, उरुळी देवाची, पुणे मुळ रा. फकीरा नगर, वैराग नाका, ता. तुळजापुर, जि. धाराशिव हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे ५० पेक्षा जास्त वाहनचोरीचे गुन्हे नोंद आहेत. त्यास नशा करण्याची सवय आहे. वाहन विक्रीतुन आलेल्या पैशातुन तो मौजमजा करीत असे. तसेच मेट्रो स्टेशन जवळ व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाडयांचे लॉक जुने झाले आहे अशा दुचाकी हेरून डुप्लीकेट चावी वापरून त्या चोरी करून घेवून जात होता. तसेच शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला सांगत होता की, “मी फायनान्स कंपनीत कामाला असून हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो.” त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा

कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे यास साथ देवून त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर ग्राईंडरने खराब करून त्या दुचाकी गावामधील शेतकऱ्यांना व गरजूंना कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकत होता.

पोलीसांच्या तर्फे जनतेला आवाहन आहे की, कोणत्याही जुन्या मोटर सायकलची मालकी बाबत व कागदपत्रांची खात्री झाल्याशिवाय गाड्या खरेदी करू नयेत व अशा अमिषाला बळी पडू नये. पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४३०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या दाखल गुन्हयाचा तपास ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३. पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही, श्री अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा सो पोलीस सह आयुक्त, श्री शैलेश बलकवडे सो अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री निखील पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री विवेक मासाळ, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर (प्रभारी चार्ज), मा. श्री गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, सपोफौ मधुकर तुपसौंदर, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

50-मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरे मिळविण्यासाठी काहीही फोन 3 टिपला; प्रक्षेपण होण्यापूर्वी वैशिष्ट्ये गळती

1 जुलै रोजी भारत आणि जागतिक बाजारपेठेत काहीही फोन 3 होणार नाही. आगामी हँडसेटची सविस्तर वैशिष्ट्ये आता लॉन्च होण्यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750655170.3052F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750654381.9B3FD22 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750652045.1E536382 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750647327.9A72A14 Source link

50-मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरे मिळविण्यासाठी काहीही फोन 3 टिपला; प्रक्षेपण होण्यापूर्वी वैशिष्ट्ये गळती

1 जुलै रोजी भारत आणि जागतिक बाजारपेठेत काहीही फोन 3 होणार नाही. आगामी हँडसेटची सविस्तर वैशिष्ट्ये आता लॉन्च होण्यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750655170.3052F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750654381.9B3FD22 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750652045.1E536382 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750647327.9A72A14 Source link
error: Content is protected !!