जाहिराती व बातमीसाठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी ! सराईत मोबाईल चोरटा जेरबंद सुमारे एक लाख रुपये किंमतीचे ६ मोबाईल जप्त
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड शहरातील पिएमटी बसथांबे, बसस्थानके, आठवडी बाजार भरण्याची ठिकाणे, धार्मीक स्थळे या ठिकाणी वारंवार गर्दीमध्ये मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. झारखंड राज्यामुधन आलेले काही सराईत चोरटे शहरात गर्दीचे ठिकाणी नागरिकांचे महागडे मोबाईल हिसकावुन चोरी करीत असल्याची माहीती मिळालेने गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गाकवाड यांनी झारखंड राज्यातुन आलेल्या सराईत मोबाईल चोरट्यांचा शोध घेणेसाठी माहीतगार पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत असलेल्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने निगराणी ठेवली होती.
दिनांक ०५/०२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार संदेश देशमुख यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी माहीती मिळाली कि, झारखंड टोळीतील एक संशयित चोरीचे मोबाईलसह पवळे ब्रीज येथील बसस्टॉपला आला आहे अशी माहीती मिळालेने वपोनि गायकवाड यांचे अधिपत्याखाली पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, सागर अवसरे, संदेश देशमुख यांनी बातमीप्रमाणे सापळा लावुन संशयित इसम नामे अभिनाश कुमार महतो वय २० वर्षे मुळ रा. नया टोला, कल्याणी महाराजपुर बाजार, साहेबगंज राज्य झारखंड सध्या पुणे रेल्वे स्टेशन यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे वेगवेगळया कंपनीचे सुमारे १,००,०००/- रुपये किंमतीचे एकूण ६ ॲन्ड्राईड मोबाईल मिळुन आले. सखोल तपासामध्ये आरोपीने आळंदी, भोसरी, चाकण इत्यादी गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून लोकांचे मोबाईल हिसकावुन चोरल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६५/२०२५ BNS ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले असुन इतर जप्त मोबाईलचे बाबत अधिक तपास सुरु आहे. आरोपीत हा मुळचा झारखंड राज्यातील असुन रेल्वेमध्ये व गर्दीच्या ठिकाणी मोबाईलच्या चोरी करतो.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार देवा राऊत, सागर अवसरे, संदेश देशमुख यांनी केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























