जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- आज दिनांक १९ .२ .२०२५ फेब्रुवारी रोजी आपल्या येरवडा येथील शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा व स्वातंत्र्य सेनानी हकिम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
संपूर्ण येरवडा परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ असंख्य मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पद्धतीने घोड्यावर स्वार होऊन शोभा यात्रा काढण्यात आली
सदर परिसरातील नागरिकांनी या शोभायात्रेचा आनंद लुटला व सदर शाळेच्या शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचा तोंडभरून कौतुक केलं
या पार्श्वभूमीवर शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा व स्वातंत्र्य सेनानी हकिम अजमल खान उर्दू माध्यमिक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर शाळेच्या वतीने जयंतीच्य एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांमध्ये आपल्या राजाच्या बद्दल माहिती व्हावी म्हणून राजेंच्या जिवनावर निबंध स्पर्धा, राजेंच्या चित्रांमध्ये रंभरण स्पर्धा, आयोजित केली.
सदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची संपूर्ण तयारी शहीद अब्दुल हमीद शाळेचे उपशिक्षक अब्दुल रज्ज़ाक कोरबु सरांनी जवळजवळ पंधरा दिवस मेहनत घेऊन केली.
त्यांना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा शेख,मुख्याध्यापिका अफरोज मेंहदरगी, मुख्याध्यापिका कौसर शेख व जावेद शेख सर व माध्यमिक स्वातंत्र्य सेनानी हकिम अजमल खान शाळेच्या मुख्याध्यापिका सफिया शेख तसेच सर्व शिक्षक गण शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची साथ दिली.
सदर जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात येरवडा येथील ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक शरदचंद्र कर्नावट, भारतीय सेना सेवानिवृत्त अप्पा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते एजाज खान,सामाजिक कार्यकर्ते कुणाल बडेकर, सामाजिक कार्यकर्ते रफिक भाई भज्जीवाले यांच्या उपस्थितीत राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोभायात्रा काढण्यात आली.
(जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान)

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























