जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
चाळीसगाव पोलिसांनी गावठी पिस्टल, काडतूसासह एकास केले जेरबंद
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:-जळगाव मध्ये स्टेशन रोडवरील एका हॉटेल मध्ये बसलेल्या राहता तालुक्यातील २१ वर्षीय तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांनी गावठी पिस्टल व २ जिवंत काडतूस सह ताब्यात घेतले असून त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीवरून हॉटेलमधून ही कारवाई केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोहेकॉ योगेश बेलदार, पो.हे.कॉ. राकेश पाटील, पो.हे.कॉ. अजय पाटील, पो.ना. नितीन आगोणे व पोकॉ. निलेश पाटील हे चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. स्टेशन रोड, चाळीसगाव येथे एक इसम गावठी कट्टा बाळगून आहे. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला. किरण कैलास गायकवाड (वय २१, रा. संवसर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, सध्या शिर्डी बायपास, खंडोबा मंदिर जवळ, ता. राहता, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.
त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व २ जीवंत काडतुस असा एकूण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत पंचनामा करून पोलिसांनी शस्त्र व काडतुसे जप्त केली. सदर इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप घुले व पो.हे.कॉ. राकेश पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























