जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या आडुन मॅफेड्रॉन एम डी तस्करी करणाऱ्या आक्काला केले जेरबंद…
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- दिनांक १७ जून २०२५ रोजी, पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने एक मोठी कारवाई करत बुधवार पेठेतील मॅफेड्रॉन एम डी तस्करी करणाऱ्यां महिलेला अटक केली आहे.
तपासादरम्यान समजले की, शरणप्पा नागाप्पा कटिमणी या आरोपीने, आपली बहिण ज्योती सुनिल यादव ऊर्फ कटटी मनी वय ५० राहणार कात्रज पुणे, हिच्याकडून मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेतला होता. विशेष म्हणजे ही महिला मागील दोन वर्षांपासून बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायांच्या आडून वेश्यांना, आणि, ग्राहकांना मॅफेड्रॉन पुरवत होती.
तिच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, एन डी पी एस अॅक्टच्या कलम, ८ (क), २१ (क), १९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही महत्त्वाची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा,अपर आयुक्त श्री पंकज देशमुख,पोलीस उप आयुक्त श्री निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांची साखळी तोडण्यात यश आले असून, गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. पुढील तपास सुरु आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख