Homeखंडाळा तालुकाखंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे

मार्शल मीडिया न्यूज:- पुणे ऑनलाईन:- खंडाळा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व यशवंत पंचायत राज अभिमान अंतर्गत पंचायत समिती खंडाळा यांच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करून प्रशासनाची लोकाभिमुख प्रतिमा दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे शिबिर पंचायत समिती खंडाळा चे गटविकास अधिकारी (वर्ग १) श्री, अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

रक्त संकलनाची प्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या तज्ज्ञ रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर, रामचंद्र जाधव, डॉक्टर, सुमन सुतार, तेजश्री हुडिड व सर्व सहायक टीम यांच्या उपस्थितीत सुरक्षित व आधुनिक पद्धतीने पार पडली.

या शिबिरामध्ये ९५ पुरुष व ३३ महिला, असे एकूण १२८ अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली. महिलांचा सहभाग या शिबिराचे विशेष आकर्षण ठरला.

रक्तदान हे सुरक्षित असून एका रक्तदात्याच्या रक्तातून गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हे या उपक्रमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.

या शिबिरामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व, प्रशासनाची लोकहितवादी भूमिका व पंचायत राज संस्थांची जनसेवा या सर्व बाबींचा सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या विशेष प्रसंगी पंचायत समिती खंडाळा मधील प्रशासन विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, नरेगा घरकुल विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, उमेद कक्ष या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, ASSK विभाग, ग्रामरोजगार सेवक, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर, सहायक, आरोग्य सेवक, आशा सेविका, आयसीडीएस विभागाच्या सेविका, मदतनीस, अधिकारी, पर्यवेक्षिका, मक्तेदार शिक्षक वर्ग, दिव्यांग कक्ष व इतर सर्व विभागांचे वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी श्री. अनिल वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी श्री. प्रकाश बोंबले, तालुका आरोग्य अधिकारी श्री. चव्हाण,
उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. संजय लाड, गटशिक्षणाधिकारी श्री. गजानन आडे, काळे मॅडम, टीपीओ चौधरी, बोडरे, राऊत, बोरकर, राजेश मोरे, युवराज मांढरे, संजय गायकवाड, नितिन शिंदे, अनिकेत पवार तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

खंडाळ्यात आयोजित या भव्य रक्तदान शिबिराने समाजसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई, पुण्यात पिस्टल विक्री करणारे व खरेदीदार जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई, पुण्यात पिस्टल विक्री करणारे व खरेदीदार जेरबंद आपण पाहत आहात क्राईम न्यूज...   मार्शल...

निवडणूक मतमोजणीवेळी शांतता भंग, १९ बुलेटसह दुचाकी जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  निवडणूक मतमोजणीवेळी शांतता भंग, १९ बुलेटसह दुचाकी जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- मतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट...

पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातील नागरिकांसाठी...

ऑनलाईन फसवणूक आणि रस्त्यावर दहशत, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  ऑनलाईन फसवणूक आणि रस्त्यावर दहशत, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा आपण पाहत आहात क्राईम न्यूज... मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- दिनांक,...

रांजणगावात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; २०३ किलो गांजा मिश्रित “बंटा” गोळ्या जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  रांजणगावात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; २०३ किलो गांजा मिश्रित “बंटा” गोळ्या जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:-...

error: Content is protected !!