जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
बस मधील वयोवृध्द महीलांचे हातामधील सोन्याची बांगडी चोरी करणा-या आरोपीस अटक
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १९/०१/२०२५ रोजी दुपारी ०३/ ३० वा चे सुमारास कोंढवाकडे जाणाऱ्या रोडवरील कात्रज बस स्टॉपवर हडपसरकडे जाणाऱ्या बस मध्ये एक महीला वय ६२ वर्षे, हया जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील २.५ तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरी केली म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७४ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३, (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील कृष्णा रमेश माने, वय ४१ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार आरोपी कृष्णा रमेश माने याचा शोध घेतला असता तो कात्रज कोंढवा रोडवर बस स्टॉपवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १४/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केले तपासमध्ये त्याने कात्रज भागातुन आणखीन वृध्द महीलांचे हातामधील सोन्याच्या बांगडया चोरी केल्याचे सांगितले आहे. आरोपीकडुन सोन्याची पाटली बांगडी जप्त करण्यात आली असुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, कडील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील श्री. सावळाराम साळगावकर, पो. निरी गुन्हे श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अवधूत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख