Homeक्राईमपोलीसांची कौशल्यपुर्वक कामगिरी, खुनाचा गुन्हा उघडकीस

पोलीसांची कौशल्यपुर्वक कामगिरी, खुनाचा गुन्हा उघडकीस

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन.

पोलीसांची कौशल्यपुर्वक कामगिरी, खुनाचा गुन्हा उघडकीस

मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- दिनांक २०/०५/२०२५ रोजी शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सर्व्हस रोडवर, धबाडी, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे एका महीलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन धारधार हत्याराने वार करुन, तिस गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे, म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २६२ , २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे माननीय वरीष्ठांनी, गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील आरोपीचा तात्काळ शोध घेवुन त्यास, अटक करणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या, मननीया वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, मयत महीलेच्या मोबाईल नंबरवरुन तिचे मुव्हमेंन्टवरुन, कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंचे सुमारे १०० आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, त्यामध्ये मयत महीला ही दुचाकी गाडीवर बसुन नवले, पुलावर आल्याचे समजले. नवले पुलाचे जवळील आस्थापनांचे सुमारे ७० सी सी टी व्ही, कॅमेरे चेक करीत असताना त्या भागात, दिनांक २०/०५/२०२५ रोजी भरपुर पाऊस पडत असल्याने व सार्वजनिक रोडवरील, लाईट अपुरी असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या.

त्यामुळे तेथील रोडलगत असलेल्या खाजगी, आस्थापनामध्ये लावलेल्या, सीसीटीव्ही कॅमेरांची, पाहणी करीत असताना तेथे विज चमकल्यामुळे झालेल्या, प्रकाशात मयत महीला एका रिक्षामध्ये बसताना दिसुन आली आहे. सदर रिक्षाचे वर्णनाची पाहणी केली असता ती रिक्षा, टी व्ही एस, कंपनीची व तिचे मागील बाजुचे हुड, पुर्णता काळया रंगाचे असल्याचे समजले. त्या रिक्षाचा शोध होणेकरता, पुणे आरटीओ कडुन, टी व्ही एस कंपनीच्या, पुणे शहरामध्ये रजिस्टर असलेल्या, दहा हजार सातशे चवऱ्यांनव, रिक्षांची माहीती प्राप्त करुन त्या रिक्षांपैकी, एक हजार दोनशे, रिक्षांची वाहतुक विभागाकडुन झालेल्या दंडात्मक, कारवाईचे चलनावरून रिक्षाचे पुढील व मागील फोटो प्राप्त केले. तरी खात्री करण्याकरता नमुद रिक्षाचा, नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणाऱ्या हायवेवर, आस्थापनांमधील १५० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे, रिक्षाचा शोध घेवुन त्यामध्ये रिक्षा व आरोपी नामे शाहरुख शकील मन्सुर, वय २७ वर्षे, राहणार मुळ गाव अमखेरा, शहाजपुर, दमपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश सध्या राहणार लेन नंबर १६ ए, सय्यदनगर, इनामदार स्कुलजवळ, हडपसर, पुणे याने मयत महीलेचा खुन केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, चोरी असे एकूण ५ गुन्हे कोंढवा, हडपसर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा, व हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहेत.

माननीय वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदार यांनी पुणे ते अमखेरा, शहाजपुर, धामपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश असे एकुण ३२०० किलो मीटर अंतरावर जावुन आरोपी शाहरुख शकील मन्सुर याचा शोध घेवुन त्यास दिनांक ९/६/२०२५ रोजी धामपुर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री राजेश बनसोडे, माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमोडे, व आंबेगाव पोलीस स्टेशनकडील धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.17521111433.3290 बी 3 ईसी Source link

गडद बौने: नवीन तारा सारख्या वस्तू गडद पदार्थाचे स्वरूप प्रकट करू शकतात

खगोलशास्त्रज्ञ आमच्या आकाशगंगेच्या केंद्राजवळ “गडद बौने” नावाच्या तारा सारख्या शरीराच्या न पाहिलेला वर्गाचा अंदाज लावतात. एका नवीन अभ्यासानुसार असे सूचित होते की या वस्तू...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1752102676.9EE33FE Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.175209763.9E89A04F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1752096922.5136021 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.17521111433.3290 बी 3 ईसी Source link

गडद बौने: नवीन तारा सारख्या वस्तू गडद पदार्थाचे स्वरूप प्रकट करू शकतात

खगोलशास्त्रज्ञ आमच्या आकाशगंगेच्या केंद्राजवळ “गडद बौने” नावाच्या तारा सारख्या शरीराच्या न पाहिलेला वर्गाचा अंदाज लावतात. एका नवीन अभ्यासानुसार असे सूचित होते की या वस्तू...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1752102676.9EE33FE Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.175209763.9E89A04F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1752096922.5136021 Source link
error: Content is protected !!