जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
पुणे पोलिसांची धडक कारवाई. आंदेकर टोळीचा दत्ता काळे पकडला…
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या मागोमाग घेतलेल्या विशेष कारवाईत मोका गुन्ह्यातील आंदेकर टोळीच्या ‘वॉन्टेड’ आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
दिनांक १ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या खुनाचा बदला घेण्यासाठी संबंधित आरोपींनी कट रचून, त्यांच्या नातेवाईकांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची योजना आखली होती. त्यासाठी दत्ता बाळू काळे याला आंबेगाव पठार परिसरात रेकी करण्यासाठी पाठविण्यात आले. त्याने तेथे रूम भाड्याने घेऊन हा कट अमलात आणण्याची तयारी केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक तीनशे ९९ दोन हजार पंचवीस कलम भा दं सं. ५५, ६६(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम १(२), ३(२) आणि ३(४) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
दत्ता बाळू काळे, वय २४ वर्षे, राहणार गणेश पेठ, पुणे याचा शोध पोलीस घेत होते. त्याचदरम्यान पोलीस अंमलदार महेश बारवकर आणि मंगेश पवार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण पुलाच्या खालील भागात थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ संबंधित पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर तपासी अधिकारी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांनी दिनांक १५ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक केली.
ही कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या संपूर्ण कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुत्तार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे आणि सचिन सरपाले यांनी विशेष योगदान दिले.
या अटकेमुळे आंदेकर टोळीच्या पुढील कटाला आळा बसला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























