जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, एकाचा मृत्यू
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- मुंबई. नवी मुंबई:- कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थी आणि इतर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ९ जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात संदिप पुरोहित नावाच्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे ६ विद्यार्थी आणि अन्य ठिकाणावरील विद्यार्थी आणि पर्यटक असे मिळून ४० ते ५० जण ट्रेकिंगसाठी पनवेलजवळील कर्नाळा किल्यावर गेले होते.
किल्ल्यावर झालेल्या गोंगाटामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
(मधमाशांनी हल्ला केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले)

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख