Homeक्राईममुख्याध्यापकाचे बंद घराचा फायदा घेत चोरट्याने लांबवले दागिने

मुख्याध्यापकाचे बंद घराचा फायदा घेत चोरट्याने लांबवले दागिने

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

मुख्याध्यापकाचे बंद घराचा फायदा घेत चोरट्याने लांबवले
दागिने

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- जळगाव मध्ये कुटुंबासह भावाकडे गेलेल्या निवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घराचा फायदा घेत चोरट्याने घरातून सव्वा लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

त्याला १२ तास उलटत नाही तोच स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडीचा उलगडा केले. एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. सचिन भागवत सपकाळ (रा. मोहाडी ता. जामनेर) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

गुजराल पेट्रोल पंपाशेजारील निवृत्ती नगरातील संकल्पसिद्धी अपार्टमेंट येथील निवृत्त मुख्याध्यापक अनिल लक्ष्मण सपकाळे हे मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता त्यांची तालुक्यातील धामणगाव येथे राहत असलेली आई भावाकडे आली म्हणून पत्नी, सून व नातू यांच्यासह गेले होते. आईला भेटून अर्ध्या तासात ३.४५ वाजता फ्लॅटवर परत आले तेव्हा फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी अर्ध्या तासात १ लाख ३५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या घरफोडीची माहिती एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सचिन सपकाळ याने साथीदारांच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे समजले.

गुन्ह्यातील दुचाकी जप्त

संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईएल ३७६१), पन्नास हजार रोख व एक ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण १,३२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी सचिन भागवत सपकाळ याला पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- लोणी काळभोर, पुणे...

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

error: Content is protected !!