Homeक्राईमपुण्यातील संमती सोसायटी घरफोडी प्रकरणाचा जलद उलगडा; रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकिरण जाधव मुंबईतून...

पुण्यातील संमती सोसायटी घरफोडी प्रकरणाचा जलद उलगडा; रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकिरण जाधव मुंबईतून अटक

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

पुण्यातील संमती सोसायटी घरफोडी प्रकरणाचा जलद उलगडा; रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकिरण जाधव मुंबईतून अटक

मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- दिनांक १४ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी, पुणे शहरातील आगरकरनगर येथे असलेल्या संमती को ऑपरेटिव्ह सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये अज्ञात इसमाने घरफोडी करीत चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक तीनशे, ४६, भा, दं, संहिता कलम तीनशे, ८०, चारशे, ५४, चारशे, ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री, निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक आदलिंग तसेच ए डी एस, १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे आणि त्यांचे पथक करीत होते.

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासताना, एक संशयित इसम आढळून आला. त्याच्या हालचालींचा अधिक मागोवा घेतला असता, तो पुणे रेल्वे स्थानकावरून कॅबने मुंबईकडे निघाल्याचे दिसून आले. पुढील तपासात तो मुंबई चेंबूर येथे उतरल्याची माहिती मिळाली.

सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांनी कॅब चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक चौकशी केली असता, सदर इसम हा मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक आदलिंग आणि गुन्हे शाखेचे पथक मुंबईला रवाना झाले. वाकोला पोलीस स्टेशन येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सांताक्रुज पूर्व, मुंबई येथून घरफोडी करणारा आरोपी राजकिरण अनिल जाधव, वय २५ वर्ष, यास ताब्यात घेण्यात आले.

दिनांक १५ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपीस अधिकृतरीत्या अटक करण्यात आली असून, बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात घरफोडीचे अनेक गुन्हे त्याच्याविरुद्ध नोंद आहेत.

या संपूर्ण कामगिरीत माननीय, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री, पंकज देशमुख, माननीय, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री, निखिल पिंगळे, माननीय सहा. पोलीस आयुक्त श्री, विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, ए डी एस, १ चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे, सहा, पोलीस निरीक्षक कवठेकर, सहा, पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक आदलिंग तसेच पोलीस अंमलदार कुंभार, चव्हाण, तांबोळी, थोरात, राठोड, शिंदे, लोखंडे, जाधव, मोकाशी, टकले, पवार, राख, सरगर, मांढरे, नेवसे, ताम्हाणे, दळवी, आबनावे, शेख व वगारे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

पुणे शहर पोलीस दलाच्या दक्ष व जलद कारवाईमुळे घरफोडीचा हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस येऊन आरोपीला जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- लोणी काळभोर, पुणे...

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

error: Content is protected !!